माढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची आग्रही भूमीका ; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली 39 कोटी 6 लाखांच्या निधीची मागणी

अकलूज : माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विकासकामासांठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आग्रही भूमीका मांडत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध योजनेतून तब्बल 39 कोटी 6 लाख रूपयांच्या निधीची मागणी केली आहे.

माढा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती व विकास कामे होणे आवश्यक असल्याने प्रस्तावित कामांना 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली असून यामध्ये माढा तालुक्यातील परिते, तुळशी, सापटणे, बैरागवाडी, आरण, टाकळी, आहेरगाव ,घोटी, भुताष्टे, भेंड, परितेवाडी, उजनी, वरवडे, रुई ,गाराकोले,मोडनिंब,तांबवे,चिंचोली ,लऊळ, विठ्ठलवाडी, शेवरे, लोंढेवाढी, पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, देगाव,रोपळे, तुंगत, आव्हे,व्होळे,बिटरगाव,जाधववाडी, नांदोरे, बाभूळगाव,जळोली, करकंब, खरातवाडी, माळशिरस तालुक्यातील उंबरे(वे),मिरे,वाघोली,लवंग,वाफेगाव,कोंढारपट्टा,जांभूड,विठ्ठलवाडी, बोरगाव, नेवरे खळवे गावांचा समावेश आहे.

तीर्थविकास व पर्यटनासाठी 4.50 कोटी रूपयांची मागणी करण्यात आली असून यामध्ये माळशिरस तालुक्यातील वाघोली, नेवरे, जांभूड,माळखांबी पंढरपूर तालुक्यातील शेवते,नारायण चिंचोली,भैरवनाथवाडी उंबरे पागे,करकंब,पटवर्धन कुरोली, खेडभोसे, जळोली, अर्जुनसोंड, माढा तालुक्यातील शिराळ (टें), मानेगांव, टेंभुर्णी, भुताष्टे, लऊळ, अकोले खुर्द, सुर्ली फुटजवळगाव, रांझणी, उंदरगाव, केवड, दारफळ सीना, अंजनगांव(खे), माळेगाव, बावी, आढेगांव, मोडनिंब, गारअकोले, माढा या गावांचा समावेश आहे.
दलीतवस्ती विकासासाठी 3 कोटी रूपयांची मागणी करण्यात आली असून यामध्ये वाघोली(2), माळखांबी, लवंग, बोरगांव, मिरे, नेवरे, जांबुड, वाफेगांव, खळवे, उंबरे(वे), विठ्ठलवाडी, माळवाडी (बो), बोरगाव (5), टेंभुर्णी, परिते, चिंचोली, वडशीनगे, दारफळ सीना, अकोले खुर्द, आलेगाव बु, खैराव, बेंबळे, सुस्ते, नेमतवादी, मेंढापूर, पटवर्धन कुरोली, अर्जुनसोंड, वाडीकुरोली, देवडे, कान्हापुरी, करकम्ब, भोसे, तुंगत या 40 गावांचा समावेश आहे.
याबरोबरबच 22 गावातील जलसंधारणाच्या कामासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून यामध्ये पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी, पेहे, भोसे, करकंब, नेमतवाडी या गावातील तसेच माढा तालुक्यातील अकोले खुर्द, तुळशी, भेंड, मोडनिंब, अंजनगाव (खे), लउळ, अंजनगाव(ऊ), चिंचोली, घोटी, परिते वाडी, अरण, उजनी, पालवण, अकुंबे, उपळाई, टाकळी, रुई या गावातील जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे.

माढा विधानसभा मतदार संघातील माढा व महाळुंग श्रीपुर नगरपंचायती अंतर्गत डांबरी व काँक्रीट रस्ते, गटारी, सभामंडप इत्यादी कामांच्या माध्यमातून परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून माढा विधानसभा मतदार संघातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या विविध प्रभागातील 26 कामांसाठी व माढा नगरपंचायतीसाठी 6 कामांसाठी एकूण 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

तसेच आदिवासी विकास योजनेतून 39 गावांसाठी तब्बल 6 कोटी 6 लाख रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून माढा विधानसभा मतदार संघामध्ये माढा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यांचा समावेश असून माढा तालुक्यातील आलेगांव बु. (2), रूई, खैराव (5), रोपळे (खु.) (2), जाधववाडी, वडाचीवाडी, बेंबळे (3), माढा, पंढरपूर तालुक्यातील सांगवी बादलकोट (8), देवडे (2),करकंब (2), माळशिरस तालुक्यातील वाफेगांव, लवंग (2),वाघोली (3), जांबूड, माळखांबी, बोरगांव, माळेवाडी (बो) या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माढा विधानसभा मतदारसंघात रस्ते विकासाकरिता 2515 मधून 3 कोटीचा निधी मिळावा अशी मागणी केली आहे. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे, नांदोरे, पटवर्धन कुरोली, देवडे, भोसे, व्होळे, शेवते, खेडभोसे,नेमतवाडी, शेगाव दुमाला, भटुंबरे, भैरवनाथवाडी, सांगवी, बादलकोट, आव्हे, चिलाईवाडी माळशिरस तालुक्यातील खळवे, विठ्ठलवाडी, जांभूड उंबरे (वे), माढा तालुक्यातील चव्हाणवाडी (टें), लोंढेवाडी, उपळाई खुर्द, उजनी (मा), वरवडे, मोडनिंब, आलेगाव खुर्द, मानेगाव, जाधववाडी, आहेरगाव, लऊळ, उपळाई (बु), खैरेवाड़ी, टाकळी, आलेगाव (बु), बैरागवाडी, रणदिवेवाडी, आढेगाव, वडशिंगे, चिंचोली, पालवन, उंदरगाव, केवड वेणेगाव या गावांचा समावेश आहे.

तांडावस्ती विकास योजनेतून 29 गावांसाठी तब्बल 2 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली असून यामध्ये पंढरपूर तालुक्यातील करकंब (3), मेंढापूर, उंबरे पागे, जाधववाडी, जळोली, करोळे, रोपळे बु. हाटकर (2), राहुलनगर सुल्तानपुर (2), माढा तालुक्यातील मानेगांव, अरण, वडशिंगे, विठ्ठलवाडी, भुताष्टे, आहेरगांव, रूई, बेंबळे (2), परीते, माळशिरस तालुक्यातील मिरे, उंबरे वेळापूर, नेवरे, विठ्ठलवाडी, जांबुड, बोरगांव या गावंचा समावेश आहे.
याबरोबरच माढा विधानसभा मतदारसंघातील 26 गावातील सुमारे 50 कि.मी च्या पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली असून या मध्ये माळशिरस तालुक्यातील वाघोली, पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी, करकंब (2), पट.कुरोली (2), तुंगत, व्होळे, माढा तालुक्यातील उपळाई बु., चांदज (2), उपळाई खुर्द, मानेगांव, मोडनिंब (2), आलेगांव बु., फुटजवळगांव, मोडनिंब, वडशिंगे, नगोर्ली, पिंपळनेर, टेंभुर्णी, तांबवे (टें.), लोंढेवाडी, कापसेवाडी, राहुलनगर (सुल्तानपूर) या गावांचा समावेश आहे. खनीकर्म योजनेतून मिरे (ता.माळशिरस) येथील खडीकरण व डांबरीकरणासाठी 25 लाखांच्या निधीची मागणीही करण्यात आली आहे.

अशा प्रकारे विविध योजनांतून आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सुमारे 39 कोटी 6 लाख रूपयांच्या निधीची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून फडणवीस यांनी संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ कार्यवाही करून प्रस्तावित कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. आ.रणजितसिंहांच्या विकासात्मक दृष्टीकोनातून केलेल्या विविध मागण्यांमुळे मतदार संघातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज