माढा विधानसभा मतदारसंघातील माढा व महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीसाठी 5 कोटीं व अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत 25 लाख रूपयांची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

अकलूज : माढा विधानसभा मतदारसंघातील माढा व महाळुंग श्रीपुर नगरपंचायती अंतर्गत विकासकामांसाठीआ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 5 कोटी रूपयांची मागणी केली आहे.

माढा विधानसभा मतदार संघातील माढा व महाळुंग श्रीपुर नगरपंचायती अंतर्गत डांबरी व काँक्रीट रस्ते, गटारी, सभामंडप इत्यादी कामांच्या माध्यमातून परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभा मतदार संघातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या विविध प्रभागातील 26 कामांसाठी व माढा नगरपंचायतीसाठी 6 कामांसाठी एकूण 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून प्रस्तावित कामे मार्गी लावण्याचे सुचना दिल्या आहेत.

तसेच अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत मोडनिंब (2), बेंबळे, सुरली या गावातील विविध कामांसाठी 25 लाखांच्या निधीची मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज