माढा मतदारसंघासाठी दलीतवस्ती विकास योजनेतून 3 कोटीं रूपयांची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

अकलूज : माढा विधानसभा मतदारसंघातील 40 गावातील दलीतवस्ती विकासासाठी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 3 कोटी रूपयांची मागणी केली आहे.

माढा विधानसभा मतदार संघातील दलित वस्त्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघातील सुमारे 40 गावातील दलीतवस्त्यांसाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून प्रस्तावित कामे मार्गी लावण्याचे सुचना दिल्या आहेत.

मागणी करण्यात आलेल्या दलीतवस्ती मध्ये माळशिरस तालुक्यातील वाघोली(2), माळखांबी, लवंग, बोरगांव, मिरे, नेवरे, जांबुड, वाफेगांव, खळवे, उंबरे(वे), विठ्ठलवाडी, माळवाडी (बो), बोरगाव (5) तर माढा तालुक्यातील टेंभुर्णी, परिते, चिंचोली, वडशिंगे, दारफळ सीना, अकोले खुर्द, आलेगाव बु, खैराव, बेंबळे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, नेमतवाडी, मेंढापूर, पटवर्धन कुरोली, अर्जुनसोंड, वाडीकुरोली, देवडे, कान्हापुरी, करकंब, भोसे, तुंगत या गावांचा समावेश आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज