शंकरराव यादव राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने सन्मानित

संग्रामनगर दि.३ (प्रतिनिधी):
आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूरचे सेवा जेष्ठ शिक्षक शंकरराव यादव यांना रोटरी क्लब इंटरनॅशनल सराटी डिलाईट नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सपत्नीक गौरवण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून अकलूज येथील रूपा बँक्वेट हॉल येथे तालुक्यातील नामांकित शाळांमधील ११ शिक्षक-शिक्षिका यांना पुणे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके- चानसलकर यांचे शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर सहाय्यक गव्हर्नर हनुमंत पाटील,रोटरी चे प्रेसिडेंट अनिल जाधव,सेक्रेटरी विलास शिंदे,रोटरियन अभिजीत चंकेश्वरा,संस्था शाळा समिती सदस्य यशराज देशमुख हे उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील अभिनव,अतुलनीय व उत्तुंग राष्ट्र निर्माण कार्याबद्दल या पुरस्कारासाठी शंकरराव यादव यांची निवड करण्यात आली.त्यांनी स्काऊट-गाईडच्या माध्यमातून शाळेतील १५० पेक्षा जास्त विद्यार्थी हे राज्य पुरस्कार व राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार, नवी दिल्ली पर्यंत पोहोचविले आहेत,राजस्थान राष्ट्रीय जांबोरीत राष्ट्रीय स्टाफ म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.अनेक जिल्ह्यात,विविध राज्यात व राष्ट्रीय स्तरावर शिक्षक-शिक्षिकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य केले आहे.तसेच बांगलादेश ढाका येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चा सत्रात भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.प्रणव प्रकाशनातून सहा पुस्तके प्रकाशित केली आहेत.त्यांना आजवर अनेक ठिकाणी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त आहेत.त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गुणगौरव या राष्ट्र शिल्पकार पुरस्काराच्या निमित्ताने होत आहे.या पुरस्काराचे निमित्ताने स्काऊट-गाईडचे पदाधिकारी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामदास देशमुख,उपाध्यक्षा शुभांगीताई देशमुख,सचिव भारत कारंडे व मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी अभिनंदन केले!

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज