राष्ट्रीय नाभिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने कु.निलीमा चव्हाण हत्या प्रकरणी राज्याचे ऊपमुख्यंञी तथा गृहमंञी देंवेद्र फडणविस यांना निवेदन

कुर्डूवाडी प्रतिनिधी  :- ओमळी ता.चिपळुण जि.रत्नागीरी येथील नाभिक कुटुंबातील कु.निलीमा सुधाकर चव्हाण ही दापोली येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये नोकरीला होती.दि.२९जुलै रोजी ती राहत्या घरी जाण्यासाठी एस टी बसने निघाली असता ती घरी पोहचलीच नसल्यामुळे तिच्या कुटुंबाने शोधाशोध सुरु केली.पण तिचा शोध न लागल्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार दिली.तरी पण दोन दिवसानी तिचा मुृत देह दोभोळ ता.दापोली येथे डोक्यावरील केस तसेच भुवया काढलेल्या भयानक अवस्थेत मिळाला.
तिचा मृतदेह ज्या अवस्थेमध्ये मिळाला असता घातपात झाला असावा अशी शक्यता जास्त आहे.तिच्या अत्याचार करुन तिचा मृतदेह अशा प्रकारे विद्रुप करुन खाडी मध्ये फेकुन देण्यात आला का ? याचाही तपास होणे गरजेचे आहे.तथापी आधी पासुनच ऊदासीन असलेल्या दापोली पोलीसकडुन योग्य प्रकारे तपास होताना दिसुन येत नसल्यामुळे ७ दिवस होणुनही अजुन त्यांना गुन्हेगार शोधन्यास अपयश आले आहे.
ही गंभीर बाब लक्ष्यात घेता या गुन्हा चा तपास स्वतंञ तपास यंञणे मार्फत होण्याचे आदेश तत्काळ देण्यात यावेत.तसेच आरोपीस तत्काळ अटक करुन हा खटला फास्टट्रक कोर्टात चालुन ऊज्जवल निकम यांना सरकारी वकील नेमुण, आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा कशी होईल या साठी सरकारने प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली.
तसे न झाल्यास दि१५ ऑगस्ट २०२३ रोजी राज्यभर लोकशाही पध्दतीने अंदोलन केले जाईल त्याची सवस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा राष्ट्रीय नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर या वेळी दिला.
सदर निवेदन प्रांत कार्यालय येथे नायब तहसीलदार किरण कदम यांनी स्विकारले. त्यांनी या विषयी आपले निवेदन व आपल्या भावना वरीष्ठाना तत्काळ पाठवुन देतो असे या वेळी सांगीतले.
या विषयी भाजपा युवा मोर्चा माढा तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष ऊमेश पाटील व बालाजी गायकवाड यांनी तर महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाअध्यक्ष सागर लोकरे शहरअध्यक्ष सागर बंदपट्टे यांचेसह सर्वांनी या वेळी दिला.
या वेळी रामदास राऊत,संजय गाडेकर महाराज,वैजिनाथ राऊत,भारत चौधरी,गणेश भालेकर,कुमार दळवी,संतोष गाडेकर,औंकार गाडेकर,तेजस गाडेकर,राजु सावंत,अजय काशिद यांचे सह नाभिक समाज बांधव ऊपस्थीत होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज