राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन 

प्रतिनिधी :-अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी व अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोजे- चौंडेश्वरवाडी (ता.माळशिरस) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन संपन्न झाले.

        शिबिराचे उदघाटन सरपंच सौ.अलका शिवाजीराव इंगोले देशमुख यांच्या हस्ते सरकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील व कै. अक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अनिल भानवसे होते. शिबिरामध्ये नवीन मतदार नोंदणी, रक्तदान शिबिर ,ग्राम स्वच्छता, आयुष्मान भारत कार्ड, वृक्षारोपण, जनजागृती आणी किर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मा. श्री. शिवाजीराव इंगवले देशमुख यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना , संबोधित करताना ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनासाठी चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका शिवाजीराव इंगवले देशमुख ,उपसरपंच अनंत कोयले, माजी सरपंच दत्तात्रेय माने देशमुख , शिवाजीराव इंगोले देशमुख, प्रशांत मोहिते तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

       पहिल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी चौंडेश्वरवाडी देवी परिसर व हनुमान मंदिर परिसर स्वच्छ करून सुरुवात केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बापुराव अंकलगी यांनी केले तर बी. फार्मसी तृतीय वर्षातील चि. श्रीप्रसाद कुलकर्णी व कु. प्रियंका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. रविराज जळकोटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.महेश मिटकल , प्रा. प्रविण दुपडे , प्रा. प्रशाली शिंदे , सुषमा शिंदे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज