भटक्या अस्थिर व असंघटित समाजास रेशन कार्ड अटी शिथिल करा – महेश शिंदे

प्रतिनिधी :-भटक्या समाजातील व्यक्तींला एकाच जागी स्थिर रोजगार न मिळाल्याने सतत भटकंती करावी लागते.अशा असंघटित विभागात काम करणा-या मजूरांना आपल्या वास्तव्याचा, व्यवसायाचा, मुलांच्या जन्माचा तसेच शिक्षणाचा कागदोपत्री पुरावा सादर करणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे मूळच्या गावाशी संबंध तुटल्यामुळे त्यांच्या वास्तव्याच्या स्थलांतराचाही कागदोपत्री पुरावा मिळणे शक्य होत नाही. अशा कुटुंबांची सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील विसंबून राहण्याची स्थिती विचारांत घेऊन अशा असंघटित कामगारांना, तसेच अस्थिर जीवन जगणा-या मजूरांना त्याच्या उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्यात यावी,अशा कुटुंबाकडून शिधापत्रिकेसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरुन घेण्यांत यावा. त्या अर्जातील माहितीच्या आधारे शिधावाटप पुरवठा निरिक्षकांनी अर्जदाराच्या वास्तव्याची, कुटुंबातील व्यक्तिची प्रत्यक्ष पाहणीद्वारे खात्री करावी व त्यानंतर अशा कुटुंबाना नवीन शिधापत्रिका देण्यात याव्यात. हा प्रश्न भटक्या विमुक्त जाती जमाती मधील समाज बांधवांच्या हिताचा असून शैक्षणिक व सरकारी योजना करिता रेशन कार्ड ची आवश्यकता भासते त्यामुळे हा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल.असे निवेदन महेश शिंदे तहसील कार्यालय यांना दिले आहे.यावेळी शंकर मस्के , बाळू महिडा आदी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज