रत्नाई कृषि महाविद्यालयातर्फे संगम येथे लम्पी लसीकरणाचे आयोजन

प्रतिनिधी :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज येथील कृषी कन्या साक्षी सोनवणे, गीतांजली ढेकळे, साक्षी घाडगे,पूजा सलगर, प्रियांका काळदाते पाटील,वनश्री सुतार , गौरी कुबेर, प्रियांका कोकरे आणि वर्षा गलंडे यांच्या कडून माळशिरस तालुक्यातील संगम (ता: माळशिरस) यांनी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील , प्राचार्य  आर. जी. नलवडे,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम.एकतपुरे ,कार्यक्रम अधिकारी प्रा. एम एम चंदनकर, प्रा. एच. व्ही. कल्याणी तसेच प्रा. डी. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोवांशिय जनावरांतील “लम्पी”चर्म रोग यावरील ‘ गोटपॉक्स ‘ या लसीचे लसीकरण करण्यात आले. सदर रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, गोचीड,गोमाष्या, निर्मूलन , स्वच्छ गोठे इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास संगम गावचे सरपंच मा. श्री. नारायणराव ताटे देशमुख, उपसरपंच मा .श्री.दशरथ महाडिक, ग्रामसेवक डी. एस.जाधव तसेच मा. डॉ. एस. एस . राऊत पशुधन विकास अधिकारी, श्री.गणेश देवकर (परिचर) व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज