शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करा माहिती अधिकार कार्यकर्त्याची तहसीलदार माढा यांना निवेदनाद्वारे मागणी 

प्रतिनिधी :- माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच हा कायद्याचे महत्त्व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा, असा शासन निर्णय क्रमांक केमाअ २००८/पत्र क्र. ३७८/०८ सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 20 सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे.

 

सदर निर्णयानुसार दरवर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहेत या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे शासनाने सुचवले आहे. त्याची आपल्या शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी यावर्षी २८ सप्टेंबर या दिवशी अनंत चतुर्दशी व ईद-ए मिलाद सणाची सुट्टी असल्यामुळे २८ सप्टेंबर रोजी शक्य नसल्यास माहिती अधिकार दिन २७ सप्टेंबर किंवा २९ सप्टेंबर या दिवशी साजरा करावा ,अशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयात तातडीने करण्याकरता तहसीलदार माढा यांना माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज