लग्न मुहूर्ताअगोदरच चोरट्यांनी साधला दागिने चोरण्याचा मुहूर्त

अकलूज :-सदाशिवनगर ता. माळशिरस येथील शिवामृत भवन मंगल कार्यालय या ठिकाणी दोन वधू-वर यांचे 5 लाख 52 हजार 271 रुपये किमतीचे  सोने व चांदीचे दागिने लग्न मुहूर्ताच्या अगोदरच अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याने विवाह स्थळी गोंधळ निर्माण झाला.

       याबाबत सविस्तर वृत्त असे की भारत बाजीराव कोळेकर रा. जळभावी, ता. माळशिरस यांचे चिरंजीव विनोद आणि उद्धव आप्पासो शेंडगे रा. वाटलूज, ता. दौंड, यांची सुकन्या  तृप्ती तसेच भारत बाजीराव कोळेकर रा. जळभावी, ता. माळशिरस यांचे चिरंजीव विष्णू व  सुरेश रामचंद्र वाघमोडे रा. बांगर्डे यांची सुकन्या दीप्ती यांचा शुभविवाह शिवामृत भवन मंगल कार्यालय, पुणे-पंढरपूर रोड, सदाशिवनगर येथे शनिवार दि. 06/01/2024 रोजी दुपारी 02 वाजून 35 मिनिटे या शुभमुहूर्तावर संपन्न होणार होता.

        विवाह सोहळ्यासाठी आणलेले नववधूंचे दागिने कोळेकर परिवार यांच्याकडे होते. त्यांनी नववधूंना सोन्याचे मंगळसूत्र, गंठण इ. तसेच चांदीची जोडवी, पैंजण असे दागिने केलेले होते. नवरदेव यांना सोन्याच्या अंगठ्या असे सर्व दागदागिने असणारी पिशवी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. पिशवी गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोधाशोध केली. परंतु, दागिने असणारी पिशवी हाती न लागल्याने माळशिरस पोलीस स्टेशन येथे महावीर लक्ष्मण कोळेकर रा. जळभावी यांनी फिर्यादी जबाब देऊन सदरच्या घटनेविषयी तक्रार दाखल केलेली आहे. भारतीय दंड संहिता 1960 कलम 379 प्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे. सदरच्या गुन्ह्यांमध्ये सोने व चांदीचे दागिने एकूण 05 लाख 52 हजार 271 रुपये किमतीचे अज्ञात चोरट्याने लंपास केलेले आहेत. माळशिरस पोलीस स्टेशन सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज