केम येथे मेन रोडवरील ज्वलरीचे दुकान फोडून सुमारे दिड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला तसेच इतर हि तीन ते चार ठिकाणी घरफोडी

प्रतिनिधी :-करमाळा तालुक्यातील केम येथे पाच सप्टेंबरच्या रात्री. घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला तसेच मेन रोडवरील ज्वलरीचे दुकानाचे कुलूप तोडून सुमारे दिड लाखाची चोरी झाली.

या बाबत ज्वलरीचे दुकानाचे मालक सुरेश पंडित वय ४४ यानी करमाळा पोलीसात फिर्याद दिली त्यामध्ये म्हटले आहे की, दिवसभर दुकानात काम करून रात्री नऊच्या सुमारास माझे दुकान बंद करून घरी गेलो आणी जेवण करून बसलो तो पर्यंत माजी चेअरमन आनंद शिंदे यानी फोन करून सांगितले कि मामा अर्जुन रणदिवे यांना सांगा गावात चोर आले आहेत ,पंरूतु रणदिवे सर बाहेर गावाला गेले आहेत, मी रणदिवे सरांचा घराकडे पाहिलें असतां घराचा कडिचा कोयंडा काढलेला दिसला म्हणून रात्री मी व माझे मित्र उत्तरेश्वर रामचंद्र तळेकर व नागराज अर्जुन तळेकर माझे दुकानाकडे गेलो पंरूतु माझा दुकानाचा कोंयडां तुटलेला दिसला असता आपली चोरी झाली हे लक्षात आले या मध्ये पाहिले असता २२७५०रु किमतीचे वजन३२५ग्रम नग चांदिचे करदुडे,
५२५००रू किमतीचे ७५०ग्रम वजनाचे ३०नग चांदिची जोडवी,
२२०५०रु किमतीचे ३१५ग्रम वजनाचे ३५नग चांदिची फॅन्सी जोडवी,
१४७००रु किमतीचे२१०ग्रम वजनाचे ३नग चांदिचे पैजन रिपेरिंग साठी आलेले
४००००रू किमत८ग्रम वजनाचे १नग फुले,झुबे सोन्याचे (कोयमतुर)
असा एकूण एक लाख बावन्न हजार रूपयाचा माल चोरीस गेला या बाबत करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे .

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने करीत आहे या शिवाय अर्जन रणदिवे सर हे बाहेर गावाला गेले आहेत ते आल्यावर त्यांची काय चोरी झाली हे कळेल या अगोदरही केम येथे चोऱ्या झाल्या आहेत पण एकाहि चोरीचा तपास लागला नाही. त्यामुळे चोरटयाचे फावते
पोलीसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे .

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज