सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरच्या ‘#ThandRakh’ पोस्टचा घेतला समाचार    

2023 च्या विश्वचषकात टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत, 50 षटकांच्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सात गडी राखून पराभव केला. 

    पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी 82 धावांची भागीदारी केल्यावर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेत उत्कृषट कामगिरी केली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील लय चालू ठेवत रोहितने आणखी एक फलंदाजीचा क्लास दाखवून दिला . श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीसह त्याची अर्धशतकी खेळीने भारताने 117 चेंडू शिल्लक असताना 192 धावांचा सहज पाठलाग केला.

 

या सामन्यानंतर, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याचा जुना प्रतिस्पर्धी शोएब अख्तरने केलेल्या ट्विट चा समाचार घेतला. शोएबने सामन्यापूर्वी बाबरच्या नेतृत्वाखालील संघासाठी संदेश पोस्ट केला होता त्यामध्ये सचिनचा समावेश असलेल्या भारतीय संघासोबतच्या त्याच्या जुन्या संघर्षातील एक चित्र शेअर करत अख्तरने संघाला शांत आणि संयमी मनाने खेळण्याचे आवाहन केले होते.

 

ते ट्विट होते: “कल अगर ऐसा कुछ करना है, तो #ThandRak.”

सचिनने शनिवारी उत्तर दिले: “माझ्या मित्रा, आप का अडव्हाइस फॉलो किया और सब कुछ बिलकूल थंडा रखा… (माझ्या मित्रा, त्यांनी तुझ्या सल्ल्याचे पालन केले आणि त्यांची कामगिरी एकदम सपाट होती)”

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारत तीन सामन्यांत तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. आता पुढील गुरुवारी 19 ऑक्टबरला पुण्यात बांगलादेशविरुद्ध भारताचा सामना असणार आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज