कृषी दुतांच्या वतीने सदाशिवनगर मध्ये कृषी सल्ला केंद्राचे उदघाटन

प्रतिनिधी :- शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलुज, महत्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम 2023 -24 कृषी सल्ला केंद्राचे उदघाटन सदाशिवनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मा. विरकुमार दोशी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच उदय धाईजे, जिल्हाअध्यक्ष सोमनाथ भोसले,ग्रामसेवक  प्रशांत रुपनवर, विष्णु भोंगळे , अपर्णा लोंढे, विलास फडतरे, मल्लारी भुजबल, लालखान पठाण, बबन भुजबल,मदन सुळे, प्रदीप पालवे उपस्थित होते . यावेळी कृषी दुत यांनी शेतकऱ्याना माती परिक्षणाचे मुल्य, पिकांवरील रोगाची घ्यावयाची काळजी व उपाय, भरघोस उत्पन्न होण्यासाठी मार्गदर्शन, शेतमाल निर्यात व साठवणुक यांचे फायदे व तोटे याविषयी मार्गदर्शन केले.
अकलुज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री संग्रामसिंह जयसिंह मोहिते – पाटील यांचे मार्गदर्शना खाली रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलवडे,समन्वयक प्रा एस एम एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा एम एम चंदनकर , प्राध्यापिका एच व्ही कल्याणी यांचे मार्गदर्शना नुसार कृषी दुत तेजस काटे,अशितोष गायकवाड, प्रताप कटके, तुषार चव्हाण, अभिषेक शिरसट, महेश शेटे, मकसुद पठाण, रोहण खंदारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला शेतकरी व ग्रामस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज