सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील 2024 च्या साहित्य पुरस्काराच्या मानकरी डॉ. सुवर्णलता नाईक निंबाळकर तर विशेष साहित्य पुरस्कार इंद्रजित भालेराव यांना जाहीर 

 

अकलूज(प्रतिनिधी) :साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा यंदाचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विशेष साहित्य पुरस्कार प्रा.इंद्रजित भालेराव यांना तर साहित्य पुरस्कार डॉ सुवर्णलता नाईक निंबाळकर यांना जाहीर झाला असून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १४ जानेवारी रोजी विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचे मोठ्या थाटामाटात वितरण होणार असल्याची माहिती पुरस्कार कमिटीच्या अध्यक्षा कु.स्वरूपराणी मोहिते पाटील यांनी दिली.

 

श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार २०२४ वितरण सोहळा साहित्य समेंनलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे शुभहस्ते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे अध्यक्षतेखाली तसेच सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

     आपल्या सिध्दहस्त लेखणीने सामाजीक, वैचारीक, सांस्कृतीक कथा कविता ललित, ऐतिहासीक, चरित्र, आत्मचरित्र इ. साहित्य प्रकारामध्ये अमुलाग्र योगदान देऊन समाज प्रबोधन करणा-या साहित्यीकांचा सन्मान करणेकरीता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार-२०२३ पासून वितरण सोहळा चालू केला असलेबाबतची माहिती सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार कमिटीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी दिली.

     यावर्षी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विशेष साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव, धाराशिव व साहित्य पुरस्कार डॉ. सौ. सुवर्णलता नाईक- निंबाळकर, फलटण यांना जाहिर करण्यात आला आहे.गतवर्षी सन २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्रीधर मोरे यांचे शुभहस्ते व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांचे अध्यक्षतेखाली विशेष साहित्य पुरस्कार अच्युत गोडबोले, मुंबई, ललित साहित्यकृती पुरस्कार डॉ. यशवंत पाटणे, सातारा व कविता साहित्यकृती पुरस्कार डॉ. राजेंद्र दास, कुर्डूवाडी यांना देऊन सन्मानित करण्यात आले होते.सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार-२०२४ वितरण सोहळा रविवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना प्रशासकीय कार्यालयातील उदय सभागृह येथे होणार आहे.

      सर्व साहित्य प्रेमीनी सदर पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार कमिटीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी केले. सदर प्रसंगी श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज