सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये क्रिकेट संग्राम २०२३ चे शानदार उदघाटन

अकलूज दि.१७ (प्रतिनिधी):सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट संग्राम २०२३ या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले यांचे हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांच्या उपस्थितीमधे उत्साहात संपन्न झाले.   

क्रिकेट संग्राम २०२३ या स्पर्धा १७ जानेवारी २०२४ ते दि. १९ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये होणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये अकलूज परिसरातील सर्व शैक्षणिक व सहकारी क्षेत्रातील चौदा संघानी उत्साहाने सहभाग नोंदविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे यांनी दिली.

क्रिकेट संग्रामच्या पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या दोन संघांनी सेमी फायनलपर्यंत मजल मारली.या स्पर्धेतील सर्व सामन्यांचा धावफलक क्रिकहिरोज या मोबाईल ॲपवर पहाता येणार आहे.स्पर्धेच्या आयोजनाचे काम प्रा.गौरव देशपांडे व रामदास खोले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाहत आहेत.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज