आटपाडीचे दलित साहित्यिक विलासराव खरात यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

अकलूज दि.१७ (प्रतिनिधी):लोकनेते राजारामबापू पाटील यांनी समाजातील सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांवर नितांत प्रेम करून त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचे व त्यांना मदत करण्याचे मोठे योगदान दिले होते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आटपाडीचे सुपुत्र दलित साहित्यिक विलासराव खरात यांचा सत्कार करताना बापूंचा शिष्य म्हणून मला अत्यानंद होत आहे. असे भावपूर्ण उद्‌गार लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू हायस्कूल आटपाडी आयोजित कार्यक्रमात काढले.         

सुरुवातीला मोटे सर यांनी प्रास्ताविक भाषण केल्यानंतर मराठी साहित्य मंडळ,मुंबई यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिलेल्या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार कराड येथे साहित्य संमेलनात विलासराव खरात यांना देण्यात आला होता.आज राजारामबापू पाटील पुण्यतिथी निमित्त त्यांचा सत्कार श्री भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

आपल्या भाषणात रावसाहेब पाटील पुढे म्हणाले ५५ वर्षापूर्वी जत,आटपाडी,कवठेमहाकाळ या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती जमिनीला कायम स्वरूपी हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी लढा उभारणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव नेते राजाराम बापू पाटील होते.असा दूरदृष्टीचा नेता पुन्हा मिळणार नाही.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी बापूच्या जीवन चरित्रावर भाषण केले.    

           या सत्काराला उत्तर देताना विलासराव खरात म्हणाले की,माझ्या सारख्या गरीब घरातील,दलित साहित्यिकाचा सत्कार आज राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त बापूंचे शिष्य रावसाहेब काका पाटील यांच्याकडून होत आहे हे माझे भाग्य समजतो इथून पुढच्या काळात दर्जेदार लिखाण करण्याच्या संदर्भात मला या कार्यक्रमामुळे शक्ती मिळाली आहे.त्याबद्दल सदैव राजारामबापू हायस्कूलचा ऋणी राहीन.

याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरज पाटील,नितीन डांगे,संजय पुजारी,आनंदराव ऐवळे मुख्याध्यापक टी.डी. चव्हाण व त्यांचा सर्व स्टाफ हजर होते.कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेजचे प्राध्यापक एच.आर. चव्हाण यांनी सर्वाचे आभार मानले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज