सांगली भाजप वैद्यकीय आघाडीच्या संयोजकपदी डॉ.पृथ्वीराज काळे यांची निवड

अकलूज दि.१७ (प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलच्या वतीने डॉ.पृथ्वीराज मोहनराव काळे यांची सांगली विधानसभा क्षेत्र व वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश सेलच्या संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शना खाली भाजप वैद्यकीय आघाडीच्या निवडी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळासाहेब हरपळे यांनी नुकत्याच जाहीर केल्या आहेत.त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी,विभागाची कार्यकारणी,विंगची कार्यकारिणी,लोकसभा संयोजक व विधानसभा संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये डॉ.पृथ्वीराज मोहनराव काळे यांची सांगली भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीच्या संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.

डॉ.पृथ्वीराज काळे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावचे असून त्यांनी सांगली येथे प्रॅक्टिस करता करता आपली वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे.त्यांच्या निवडीमुळे अकलूज परिसरात आनंद वातावरण पसरले आहे.

ग्रामीण भागातील एक डाॅक्टरला वैद्यकीय क्षेत्रात समाजकार्य करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ.पृथ्वीराज काळे यांनी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, व सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्यामुळे ही मोठी संधी मिळाली आहे.त्याच बरोबर प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे, उदगांव शहर भाजपाचे अध्यक्ष डॉ.अजित कदम,आटपाडी खानापूरचे डॉ.प्रशांत देशमुख, प्रदेश सहसयोजक कार्यकरणी सदस्य डॉ.रविंद्र आरळी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच सर्व प्रदेश सदस्य मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले व पक्षाने माझ्या टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू व माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही डॉ.काळे यांनी दिली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज