संग्रामनगर येथील श्रीराम मंदिरात अधिक मास निमीत्त श्री कृष्णास तुलसी अर्पण सोहळा संपन्न

अकलूज दि.२९ (प्रतिनिधी):
दर तीन वर्षातून एकदा अधिक मास येतो.हिंदु धर्मात या महिन्याला खूप महत्व आहे.या महिन्यात धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते.काही भाविक या महिन्यात नवनाथ पारायण,गुरूचरित्र पारायण, श्रीकृष्ण चरित्र पारायणाचे आयोजन करतात.तर काही भाविक देव दर्शनाचे आयोजन करून देव दर्शनात व्यस्त असतात.


अधिक महिन्यात श्रीकृष्णाच्या भक्तीचे फार महत्व असते.प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाची उपासना करतात.त्यातलीच ही एक श्रीकृष्णाची भक्ती आहे.आज संग्रामनगर येथील सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिरात पुरुषोत्तम मासनिमीत्त श्रीकृष्णास एक लाख पंचवीस हजार तुलसी अर्पण करण्यात आली.
एकशे पंचवीस महिलांनी विष्णू सहस्त्रनाम पठण करून प्रत्येक महिलेने एक हजार एक तुळशी श्रीकृष्णास वाहिल्या.यामुळे घरात सुख,समाधान,सौभाग्य अधिक प्राप्त होते.इतर महिन्यातील एकादशीपेक्षा या महिन्यातील एकादशीला फार महत्व आहे.म्हणून आजच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या अधिक मास महात्म्य वाचन व अधिक मासा विषयी विस्तृत माहिती आनंद काका कुलकर्णी संग्रामनगर यांनी दिली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज