शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी :- टेंभुर्णी येथे शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व विविध उपक्रम राबवण्यात आले कुर्डूवाडी येथील ब्लड बँक यांच्या व शाहू फुले आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमानाने 151 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदाना मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला.  तसेच टेंभुर्णी ग्रामपंचायत व शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड याचाही कॅम्प घेण्यात आला .त्यामध्येही 111 जणांनी सहभाग नोंदवून या उपक्रमाचा लाभ घेतला .या कार्यक्रमासाठी उपस्थित टेंभुर्णी चे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय देवकर तसेच टेंभुर्णी चे सरपंच प्रतिनिधी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य योगेश बोबडे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट मधुकर अण्णा देशमुख माढा तालुका अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव भैय्या महाडिक, जयवंत पोळ, शांतीलाल कुटे, हरिभाऊ सटाले, संतोष वाघे ,शिवाजी कापरे, भारत ढगे साहेब, सागर ढगे ,विजय भाऊ कोकाटे ,प्रकाश बापू ढगे, गोरख कुटे, केदार नाळे ,योगेश शिंदे ,आनंद ढगे, महेश शिंदे ,भास्कर घाडगे, सोमनाथ कुटे, सिद्धेश्वर लोंढे, महेश ढगे ,अमोल शिंदे ,नितीन कुटे, संदीप वाघे व शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित होते.टेंभुर्णीच्या उपसरपंच राजश्री सतीश नेवसे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य नंदिनी बाळासाहेब ढगे, आशा सेविका सोनाली ननवरे विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन सतीश नेवसे हेही उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज