शंकरनगर येथे “महर्षि महोत्सवाचा” जल्लोष

अकलूज-सध्याच्या युगात मुलांचा शिक्षणाबरोबरच सर्वांगीन विकास महत्वाचा आहे.शिक्षणानंतर शारीरिक ,मानसिक व बौध्दिक समतोल महत्वाचा असतो त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळ अकलुजच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर द्यायला हवा.असे मत स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज संचलित यशवंतनगर येथील महर्षि शंकरराव मोहिते-प्रशाला प्राथमिक शाळा व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यांचे “महर्षि महोत्सव”वार्षिक स्नेहसंमेलन शंकरनगर येथे स्मृतीभवनच्या बादशाही रंगमंचावर मोठ्या जल्ल्लोषात संपन्न झाले.त्यावेळी स्थानिक प्रशाला समिती सभापती तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते-पाटील विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करीत होत्या.सकाळ सत्रात प्राथमिक विभागातील 401 बालचमुच्या या रंगारंग कार्यक्रमाचे उद्घाटन अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर अॕड.नितिनराव खराडे,वसंतराव जाधव,नवनाथ पांढरे,माता पालक संघाच्या सौ.इंगवले-देशमुख,सौ.रेळेकर,मुख्याध्यापक शिवाजी पारसे,मुख्याध्यापिका सौ. स.शि.गायकवाड विद्यार्थी प्रतिनिधी ची.आदित्य भोसले,कु.मयुरी म्हेत्रे,कु.साक्षी मोहिते आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला सहकार महर्षि व रत्नप्रभादेवी (अक्कासाहेब )यांच्या प्रतिमा पुजन व महर्षि गिताने करण्यात आली.तर छोट्या गटाच्या बालकलाकारांनी सादरीकरण केलेल्या भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.

पुढे बोलताना स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी आनंदी आयुष्यासाठी छंदाचे महत्त्व सांगितले.तसेच व्यासपिठावर कला सादर करणे किंवा बोलणे वाटते तितके सोपे नसते,म्हणुन कला सादर करताना विद्यार्थ्यांना सर्वांनी सन्मान द्यायला हवा असे अनमोल संदेश यानिमित्ताने दिला.
यावेळी मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी आपल्या प्रस्ताविकात मुलांना घडविण्याचे काम शिक्षक खुप तळमळीने करीत असतात.व्यक्तीच्या जीवनात कलागुण असतील तर आयुष्य सुकर होते असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईलाही बागवान तर काय्रक्रमाचे निवेदक म्हणुन चि,समर्थ अटक व कु.वृक्षाली कारमकर यांनी जबाबदारी पार पाडली.

द्वितीय सत्रात लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या कार्यक्रमास श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील चेअरमन, सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना, शंकरनगर यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींचा आनंद द्विगुणीत केला. तसेच पालकांना विद्यार्थिनींना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

महर्षि महोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये लक्ष्मीबाई कन्या प्रशालेने 16 गीते सादर केली. यामध्ये 226 कलाकारांनी सहभाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

द्वितीय सत्राचे उद्घाटन अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री साळुंखे साहेब यांनी केले.
त्यांनी विद्यार्थिनींना विविध छंद जोपासण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मगर सर व श्री. कुंभार सर यांनी केले.

सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज