शंकराव मोहिते महाविद्यालयाचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील यश

अकलूज दि.१४ (प्रतिनिधी):शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज संचलीत शंकराव मोहिते महाविद्यालयातिल विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केले आहे.महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थी अक्षय कट्टीमनी याचा राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग ८१ किलो वजनी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे़. तसेच यशराज कदम याने राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ८९ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर पृथ्वीराज चवरे यांने आर्चरी खेळ प्रकारात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला.

ठाणे येथे राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत.या मध्ये अक्षय कट्टीमनी याची बिकानेर (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष कु.स्वरूपाराणी मोहिते- पाटील यांच्या शुभहस्ते यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे,महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आर.के इंगोले, महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख युवराज मालुसरे,शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अरविंद वाघमोडे,क्रीडा शिक्षक प्रा.बाळासाहेब भोसले (मोलाणे) उपस्थित होते.

या यशाबद्दल शिक्षण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले.पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज