शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा

प्रतिनिधी :-अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे २२ डिसेंबर रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रामलिंग सावळजकर, प्रा.आबासाहेब थिटे व प्रा.डी. टी. जाधव आदी उपस्थित होते. यावेळी गणित विभागातील प्रा.पवन शिंदे, प्रा.रहाणे मॅडम, प्रा.थोरात मॅडम, प्रा.इनामदार मॅडम व सर्व विद्यार्थीही उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना विभागातील काही विद्यार्थ्यांनी आपले गणिता विषयाचे मत व श्री रामानुजन यांच्या कार्याबद्दल उत्कृष्टरित्या माहिती दिली व विभागातील प्राध्यापकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विभागप्रमुख प्रा.पवन शिंदे सर यांनी रामानुजन यांनी केलेल्या संशोधनाविषयी म्हणजेच रामानुजन पॅराडॉक्स, रामानुजन मॅजिक स्क्वेअर व त्यांचे नंबर थेअरी मधील योगदान याबद्दल माहिती दिली. प्रा.आबासाहेब थिटे सर यांनी विद्यार्थ्यांना आपले गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग व शैक्षणिक क्षेत्रातील संधी व फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रा. रामलिंग सावळजकर सर यांनी गणित विषय इतर विषयांमध्ये सुद्धा कसा उपयोगी आहे त्याच पद्धतीने गणित आपण खेळांमधून कशा प्रकारे शिकू शकतो हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे सर यांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगात सक्षम होण्यासाठी कशाप्रकारे पुढे वाटचाल करावी व गणितासारख्या विषयांमध्ये आपले भविष्य कसे सुंदर करावे याविषयी उत्कृष्ट माहिती दिली. शेवटी गणित विभागातील विद्यार्थी माने-देशमुख यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज