शंकरराव मोहिते महाविद्यालयात वन्यजीव संवर्धन सप्ताह साजरा

अकलूज दि.१० (प्रतिनिधी)अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात वन्यजीव संवर्धन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पक्षीमित्र प्रा.अरविंद कुंभार होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.कार्यकमाच्या प्रस्ताविकामध्ये प्राणी शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.सुधा बनसोडे यांनी प्राणी शास्त्र विषयाचे महत्त्व,फायदे आणि गरज त्याच बरोबरच निसर्ग चक्र चालू रहण्यासाठी वन्यजीव अतिशय महत्त्वाचे आहेत.सध्याच्या वस्तुस्थितीचा विचार केला तर पक्षी व प्राणी बेघर झाले आहेत.त्यांचे संगोपन करणे काळाची गरज आहे.

प्रमुख पाहुणे डॉ.अरविंद कुंभार यांनी विद्यार्थ्यांना पक्षांचे व्हिडिओच्या माध्यमातून जीवन चक्र दाखविले.निसर्गात पक्ष्यांचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे हे सांगितले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी नवीन शिक्षण पध्दती म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षणाची सध्या आवश्यकता आहे

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अश्विनी हेगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.मधुरा देशमुख यांनी मानले.तर प्रमुख पाहुण्यांची ओळख की.पुजा सावंत यांनी करून दिली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना पवार,गणपत लोंढे याचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज