शंकरराव मोहिते महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

अकलूज दि.९ (प्रतिनिधी):
येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.अजित गांधी म्हणाले की,विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी मानवी रक्ताला पर्याय उपलब्ध नाही आहे.आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाचा प्राण वाचू शकतो. यावेळी उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी प्रा.विष्णू सुर्वे,राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा.नंदकुमार गायकवाड,कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे उपस्थित होते.उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक डॉ.दत्तात्रय मगर यांनी केले तर आभार डॉ.सज्जन पवार यांनी मानले व सूत्रसंचलन प्रा.स्मिता पाटील यांनी केले.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढीचे कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज