शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन

अकलूज दि.११ (प्रतिनिधी):अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये आरोग्य समिती व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दंत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले.या शिबिरासाठी डॉ.नितल फडे आणि डॉ.मनाली गांधी यांचे सहकार्य लाभले. 

याप्रसंगी बोलताना डॉ.नितल फडे यांनी दात दुखीची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच दात दुखू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी,दात काढण्याविषयीचे समज गैरसमज,दात तुटण्याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी सखोल मार्गदर्शन केले.दातांची वेळीच तपासणी केली नाही तर वेदना व खर्च दोन्ही वाढतो असे याप्रसंगी त्यांनी सांगितले तसेच सुंदर हास्य हाच खरा दागिना आहे.त्यासाठी आपल्या दंतपंक्ती निरोगी ठेवणे आवश्यक आहे.अन्न बारीक चावून खाणे आरोग्यदृष्ट्या हितकारक असल्याचे याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतिश देवकर उपस्थित होते.या शिबिरामध्ये १२० जणांची दंत चिकित्सा करण्यात आली.महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख व आरोग्य समिती प्रमुख डॉ.सविता सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.विक्रम कुंभार यांनी मानले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.प्राची जगताप यांनी केले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.सी.डी.चव्हाण,प्रा.पी.एच.नलवडे,प्रा.पी.एम.धाईंजे,प्रा.डी.एफ.माने-देशमुख,बामणे सर,मालुसरे सर आणि शिक्षकेतर कर्मचारी बी.बी.कदम यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज