साहित्यिक गणपत जाधव यांच्या ‘हावळा’ कथासंग्रहास चौथे शिवाजी महाराज उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

अकलुज -प्रतिनिधी:महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, गणपत जाधव यांच्या ‘हावळा’ या कथासंग्रहास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्यिक गणपत जाधव हे महाराष्ट्रातील नामवंत असे कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे कावदान, झांजड, हावळा असे तीन कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कथासंग्रहांना या अगोदर वारणेचा वाघ फाउंडेशन वारणानगर यांचा वारणेचा पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा शंकर खंडू पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शी यांचा शाहीर अमर शेख साहित्य पुरस्कार ,मराठी वांग्मय परिषद बडोदे गुजरात यांचा अभिरुची गौरव पुरस्कार, अंकुर साहित्य संघ अकोला यांचा अंकुर वांग्मय पुरस्कार, शब्दगंध साहित्यिक परिषद अहमदनगर यांचा पारूबाई काकडे शब्दगंध साहित्य पुरस्कार, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांचा तापी- पूर्ण साहित्य पुरस्कार, मनोहर सामाजिक प्रतिष्ठान लातूर यांचा रमाई कथा पुरस्कार, डॉ. द.ता. भोसले जिव्हाळा साहित्य पुरस्कार,भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांचा यंदाचा उत्कृष्ट कथासंग्रहासाठीचा पुरस्कार गणपत जाधव यांच्या हावळा या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. रोख रक्कम ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हा पुरस्कार छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या हौतात्म्य दिनी म्हणजे 25 डिसेंबर 2023 रोजी न्यू आर्टस,काॅमर्स ॲन्ड सायन्स काॅलेजच्या राजर्षि शाहू महाराज सभागृहात मान्यवरांच्या हस्ते गणपत जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज