शिवडी शाळा संकुल मधील १२०० विद्यार्थांचे होणार शैक्षणिक नुकसान 

प्रतिनिधी :-मुंबई महानगर पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी (AO) विना सोनवणे यांच्या मनमानी कारभारामुळे शिवडी शाळा संकुल मधील १२०० विद्यार्थांचे होणार शैक्षणिक नुकसान .

गेल्या काही दिवसांपासून शिवडी शाळा संकुल मधील वर्ग मुंबई महानगर पालिकेच्या इतर शाळांमध्ये स्थलांतरीत होणार अशी कुजबूज सुरु होती. काही सामाजिक संस्था, या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व पालक प्रतिनिधी यांनी शिक्षणखात्याचे उपायुक्त, शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन विद्यार्थ्याना जवळच इतर कोणती शाळा असेल तेथे वर्ग स्थलांतरित करण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षण अधिकारी यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जवळील मुंबई पब्लिक स्कूल ची पाहणी केली व या शाळेमध्ये शिवडी शाळा संकुलमधील सर्व वर्ग सामावून घेण्याची क्षमता आहे असा निर्णय दिला.

शिक्षण अधिकारी यांनी निर्णय देवूनही शिक्षणखात्याच्या प्रशासकीय अधिकारी (AO) विना सोनवणे यांनी मनमानी करीत शिवडी शाळा संकुल या ईमारतीमधील शाळा जवळील मुंबई पब्लिक स्कूल या इमारतीमध्ये स्थलांतरित न करता शनिवार व रविवार पालकांना कोणतीही प्रशासकीय हालचाल करता येणार नाही या उद्देशाने व सूडबुद्धीने ३ ते ४ किलोमीटर लांब असणाऱ्या शाळेमध्ये स्थलांतर करण्याचे आदेशवजा पत्र शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी पत्र पाठविले आहे. या पत्रान्वये दोन दिवसांत शाळा स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत. ३ ते ४ किलोमीटर लांब शाळा स्थलांतर करत असल्याने येथील १२०० विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होण्याबरोबरच त्यांचे भवितव्यही अंधःकारमय होण्याची शक्यता नाकारत येत नाही. या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने काढलेली सूचना रद्द करुन परस्पर निर्णय न घेता पालक प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा करुन जवळील शाळेमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घ्यावा व पालक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज