अकलूज येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

संग्रामनगर दि.१९ (प्रतिनिधी):अकलूज मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११०जणांनी रक्तदान केले.

या शिबीराचे उद्घाटन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले.या वेळी संघाचे अध्यक्ष अँड.नितीन खराडे,उपाध्यक्ष विशाल गोरे,ज्येष्ठ संचालक डॉ.राजीव राणे,डॉ.सुरेश सुर्यवंशी, नवनाथ सावंत,नितीन देशमुख, उदय शेटे,डॉ.आनंद देशमुख, आदित्य माने,नितेश अंधारे,कृषी पर्यवेक्षक उदय साळुंखे आदी उपस्थित होते.

प्रत्येक रक्तदात्यांना जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती शक्तीची मुर्ती संघटनेच्या वतीने भेट देण्यात आली व रक्त पेढीकडून प्रमाणपत्र देण्यात आले.या रक्तदान शिबिरास भारतीय जनता पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली.

यावेळी संघाच्या वतीने निराधार व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप दयानंद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश महाडिक,विठ्ठल गायकवाड,इंद्रजित नलवडे, जगदीश कदम,कुंडलिक गायकवाड,दिलीप माने,योगेश देशमुख,विक्रम माने देशमुख यांनी प्रयत्न केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.धनंजय देशमुख यांनी केले तर आभार ज्येष्ठ संचालक राम चव्हाण यांनी मानले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज