मांगी येथे नवयुग तरुण मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी :काल दिनांक 19 फेब्रुवारी रोजी तिथीप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे मांगी येथील नवयुग तरुण मित्रमंडळातर्फे एक आदर्श अशी जयंती साजरी करण्यात आली. मांगी येथील नवयुग मित्र मंडळाने जयंती साजरी करत असताना सामाजिक बांधिलकीचं जपत सकाळी विधिवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी सवाद्य मिरवणूक करण्यात आली. तसेच मांगी ग्रामस्थांचे ग्रामस्थांसाठी सुरुची जेवणाची ही व्यवस्था करण्यात आली होती .यानंतर मांगी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मांगी येथील चिमुकल्या मुलींनी शिवजन्माचा पाळणा या गीतावरती नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली .

           यावेळी मांगी गावाचे नाव उज्वल करणारे राजकीय ,सामाजिक शैक्षणिक, वैद्यकीय ,कला क्रीडा पोलीस दल, क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या माता-पितांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जालिंदर बागल, डॉ . संमेक संचेती , डॉ प्रदीप बागल ,अभिजीत नरसाळे अमोल राऊत, रोहिदास शिंदे ,प्रियंका ननवरे ,अनिता अवचर, संजय सोनवणे ,अनिल नलवडे अमोल राऊत ,. एडवोकेट भाग्यश्री संचेती , विक्रम चौरे ,विश्वजीत बागल प्रशांत बागल,,,,बापू धुमाळ अविनाश शिंदे ,जयकुमार बागल ,मोहिनबी पठाण सागर कडवकर ,चारुशीला बागल, संदीपान जमदाडे मयूर शिंदे ,प्रवीण अवचर ,अविनाश शिंदे प्रमोद बागल, आधी गुणवंतासह मातापित्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, शाल श्रीफळ, व गुलाबपुष्प, देऊन सत्कार करण्यात आला .यानंतर ग्रामस्थांसाठी ह.भ.प.अमोल महाराज काळदाते यांचे सुश्राव्य किर्तन ठेवण्यात आले होते.

हा आदर्श कार्यक्रम पार पाडण्यासाठी नवयुग तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. यासाठी मांगी भजनी मंडळासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते..

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज