‘सुराज्या’साठी शिवरायांच्या विचारांचा जागर -प्रा. देवानंद साळवे 

अकलूज -छत्रपती शिवाजी महाराज यांनी 350 वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापन केले, परंतु आजही आपण सुराज्य निर्माण करू शकलो नाही, तेव्हा या स्वराज्याचे रूपांतर ‘सुराज्यात ‘ व्हावे यासाठी शिवरायांच्या विचारांचा जागर करण्याची गरज असल्याचे विचार शिवव्याख्याते प्रा. देवानंद साळवे यांनी शिवजयंती महोत्सव समिती, माळशिरस आयोजित शिवजयंतीनिमित्त मांडले.

        शिवजयंती महोत्सव समिती,माळशिरस यांच्यावतीने शिवजयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवव्याख्यानात पुढे बोलताना प्रा. साळवे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रशासन कसे चालवावे व सुशासन कसे असावे याचे आदर्शवत उदाहरण संपूर्ण जगासमोर मांडले. स्त्रियांसाठी फॅमिली पेन्शन, मुलांना स्वराज्यात नोकरी,आर्थिक दुर्बल कुटुंबाना रेशन,त्या मुलांना आर्थिक सहकार्य या गोष्टीचा बारकाईने विचार करीत प्रजाहीतदक्ष राजा म्हणून सुराज्य निर्माण केले. युद्धापेक्षा रयतेच्या सुखाचा विचार करणारा जगातील एकमेव राजा असल्याचे सांगितले.

         शिवजयंतीनिमित्त सिंहगड येथून शिवज्योत आणली होती. त्याचे स्वागत माळशिरस तहसील कार्यालय शिवस्मारक येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. तसेच माळशिरस शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शहाजी राजे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाच्या गर्जनाने परिसर अगदी शिवमय झाला होता.

यानंतर माळशिरस शहरातील माजी सैनिकांचा सन्मान समितीच्या वतीने करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष तुळशीराम साळुंखे, नीलेश घाडगे, विजय जाधव सर, संतोष साळुंखे, अशोकराव रणनवरे,नंदकुमार घाडगे व कार्यकर्त्यांनी केले होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज