शिवशंकर बझार मध्ये तांदुळ महोत्सवाचे शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ; ९३ प्रकारचे तांदुळ विक्रीस उपलब्ध

अकलूज : येथील शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्थेच्या शिवशंकर बझारमध्ये तांदूळ महोत्सवास उत्साहात सुरूवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या संचालक शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक जगन्नाथ धुमाळ, नारायण फुले, अर्जुन भगत, अनिल मुंडफणे, अनिल उघडे, कैलास ताटे, व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांच्यासह बझारचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

 

उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या ध्येय धोरणानुसार व चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात गेल्या २८ वर्षापासून ना नफा ना तोटा तत्वावर सामाजिक बांधिलकी जपत शिवशंकर बझार सहकारी तत्वावर कार्यरत आहे. किर्तिध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणारा तांदुळ महोत्सव शिवशंकर बझारचे प्रमुख आकर्षण असते. माळशिरस तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील चोखंदळ व खवय्ये ग्राहक अवर्जुन या तांदूळ महोत्सवाला भेट देतात.

 

यावर्षीच्या तांदुळ महोत्सवामध्ये ९३ प्रकारच्या विविध नामांकित कंपनींचे तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय ग्राहकांच्या सोईकरीता त्यांच्या पसंतीनुसार बझारने लचकारी कोलम, बासमती शेला, इंद्रायणी, आजारा घण्साळ, आजरा इंद्रायणी, डायेट (लाल उकडा) ॲार्गेनिक बासमती अशा प्रकारचे महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील विविध प्रकारचे तांदूळ या महोत्सवामध्ये माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहेत. हा तांदूळ महोत्सव ०१ मार्चपर्यंत चालू राहणार असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी केले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज