जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत वरधं विद्यालयाचे धवधवीत यश

प्रतिनिधी :-जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकतीच रसायनी येथे संपन्न झाली. या क्रीडा स्पर्धेत रा. शि. प्र. मंडळ महाड चे श्री. छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वरधं या गावातील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात उज्वल यश संपादन केले. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत वरधं विध्यार्थीनींनी वैयक्तिक खेळातील वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात धवधवीत यश मिळवले. १३ वर्ष खालील वयोगटा मध्ये कुमारी. चंदना तानाजी पोळ हिने गोळाफेक, थाळीफेक, हातोडा फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवले व अश्या पुढील खेळासाठी मुंबई विभागीय स्तरावर निवड झाली तर कुमारी लावण्या सखाराम जाधव १७ वर्ष वयोगटात भालाफेक मध्ये तृतीय क्रमांक मिळवले. या दोन्ही यशस्वी विद्याधींनींना विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. नितीन माळवदे सर, क्रीडा शिक्षिका सौ. जयश्री पाटील मॅडम, प्राध्या. श्रीमती नवले मॅडम व प्राध्या. श्री. सकपाळ सर यांनी मार्गदर्शन केले. या यशानंतर रा. शि. प्र. मंडळ महाड चे अध्यक्ष मा. श्री. हनुमंत (नाना) जगताप व मा. श्री. रामतात्या देशमुख (रा. शि. प्र. मंडळ विश्वस्त) विद्यालयाचे सभापती मा.श्री. शहाजी बापु देशमुख शिक्षकवृंद, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक समिती तसेच वरधं पंचक्रोशीतील सर्व खेळाडुंचे व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज