गणपती फार्मसीमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

प्रतिनिधी :- अकोले (खुर्द), ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात दि. ०५/०२/२०२४ ते ०७/०२/२०२४ या कालावधि मध्ये क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहामध्ये विविध खेळ आयोजित करण्यात आले होते तसेच महाविद्यालयातील सर्व डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

या क्रीडा सप्ताहात क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, कबड्डी, कॅरम, चेस अशे वेगवेगळे खेळ घेण्यात आले. तसेच क्रिकेट ( मुले) मध्ये तृतीय वर्ष, क्रिकेट ( मुली) मध्ये प्रथम वर्ष, व्हॉलीबॉल (मुले) मध्ये प्रथम वर्ष, थ्रो बॉल (मुली) मध्ये तृतीय वर्ष, कबड्डी (मुले) मध्ये द्वितीय वर्ष, चेस (मुली) मध्ये शिवकन्या वाघमोडे (द्वितीय वर्ष) या संघांनी विजय मिळवला. अशा या ३ दिवसीय क्रीडा सप्ताहात अत्यंत आनंदी व खेळीमेळीचे वातावरण महाविद्यालयात निर्माण झाले असून शैक्षणिक ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना देखील प्राधान्य देणे आज काळाची गरज आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली. 

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे, प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, प्रा. आशिष जाधव, प्रा. सुकुमार लांडे व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. हा सप्ताह पार पाडण्यासाठी प्रा. प्रियंका खडसरे व प्रा. अक्षय भेंकी यांनी समन्वयक म्हणून काम केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज