गणपती फार्मसी मध्ये अमोघ 2024 उत्साहात साजरा

प्रतिनिधी :- अकोले खुर्द ता.माढा येथील गणपती फार्मसी महाविद्यालयात दोन दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मानसी मॅन्युफॅक्चरर अँड सर्विस प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई चे संचालक सिद्धेश्वर चव्हाण यांच्या हस्ते झाले. तसेच कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.

         या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य,फॅशन शो,नाटक,मिमिक्री, गायन,एकपात्री नाटक इत्यादी उपक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाचे अवचित्य साधून कलर डे,चॉकलेट डे, ट्विन्स डे,रेट्रो डे,साडी डे, फेटा डे, टाय,डे ट्रॅडिशनल डे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले होते व त्याचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. महाविद्यालयातील तृतीय वर्षामधील सांस्कृतीक सचिव दीप्ती गाडे, वर्ग प्रतिनिधी स्नेहल मोरे, मुलींच्या प्रतिनिधी माधुरी वाघमारे, मुलांचे प्रतिनाधी फरान शेख,क्रिडा सचिव सारंग भुसनर,कोमल पाटील तसेच प्रसाद वारे, प्रथमेश गायकवाड यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान लाभले.

        यावेळी संस्थेचे सचिव डॉ. आर.डी. बेंदगुडे, अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे,उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे सर्व शिक्षक व शिक्षकेतकर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.रेणुका शिंदे आणि प्रा.रूपाली राऊत यांनी काम केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज