गणपती फार्मसीच्या विद्यार्थिनींचा विभागीय खो – खो स्पर्धेत विजयी

प्रतिनिधी : अकोले (खु). ता. माढा येथील गणपती फार्मसीच्या विद्यार्थिनींनी विभागीय खो – खो स्पर्धेत सोजर कॉलेज ऑफ फार्मसी खांडवी विरूद्ध एका गुणाने विजय मिळविला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाने राज्य स्तरीय विभागीय खो-खो स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी, वडाळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती.या विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णीच्या मुलींच्या संघाने मॅच अत्यंत उत्साहात व चुरशीने लढून विजय बळकावला. या स्पर्धेत अर्चना जाधव, दीप्ती इवरे, दिपाली सुळे, धन्वंतरी दास,कोमल पाटील, पुजा कुलकर्णी, काजल खंडागळे, स्वाती बंडगर, ज्ञानेश्वरी गेंद, साक्षी शिंदे,सृष्टी घाडगे, प्राजक्ता कसबे यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष अॅड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ.रुपाली बेंदगुडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील या संघास प्रा. प्रियांका खडसरे, प्रा.महादेवी भोसले आणि प्रा. रूपाली राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज