श्री गणपती फार्मसीचे केममध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

प्रतिनिधी:-अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचा तीन दिवसीय कॅम्प केम मध्ये संपन्न झाल्याची माहिती प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे यांनी दिली. गणपती फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे स्वच्छता,वृक्षारोपण आणि मोफत आरोग्य तपासणी असे विशेष श्रमसंस्कार शिबिर केम गावातील उत्तरेश्वर मंदिरात राबवण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी मध्ये हिमोग्लोबिन चेकअप, ब्लड प्रेशर चेकअप, बॉडी मास इंडेक्स, शुगर चेकअप आणि रक्तगट तपासणी इत्यादी आरोग्यविषयक तपासण्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत मोफत करण्यात आल्या. तसेच या शिबिरासाठी केम गावातील सर्व नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयी जनजागृती रॅली काढली आणि यानंतर संस्थेचे सचिव डॉ.आर. डी. बेंदगुडे यांनी आरोग्याचे महत्त्व समजावत सर्वांचे आभार मानले. या शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा. सुकुमार लांडे यांनी कार्य केले तसेच हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. रेणुका शिंदे व प्रा. प्रज्वला खपाले यांनी कार्य केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज