पावनखिंड मॅरेथॉन मध्ये गणपती फार्मसीची ज्ञानेश्वरी गेंद तृतीय

प्रतिनिधी :-अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी येथील १०६ विद्यार्थ्यांनी पावनखिंड रन मॅरेथॉन २०२३ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या मध्ये प्रथम वर्ष बी फार्मसी मधील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी गेंद हिने पावनखिंड रन मॅरेथॉन मध्ये १० किमी गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली. या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन माढा तालुका डॉक्टर असोसिएशन यांनी केले होते व ही स्पर्धा मुख्य गट १०. कि.मी. व हौशी गट ३ कि.मी. अशा दोन गटांमध्ये विभागली होती. या स्पर्धेचे प्रमुख उद्दिष्ट समाजाला आरोग्य व व्यायामाचे महत्व पटवून देणे होते.

       यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी माढा तालुका डॉक्टर्स असोसीएशयन चे महाविद्यालयाला सहभागी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. सुकुमार लांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज