गणपती फार्मसीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

प्रतिनिधी :-मौजे अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस रिसर्च टेंभुर्णी या कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यावेळी हक्कासाठी लढताना कर्तव्याची जाणीव ठेवून कर्तृत्त्व गाजवणाऱ्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना वंदन करून प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात देशाची मान उंचवावी असे सांगितले. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष , ॲड. विजयराव हिरवे,उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे, प्रा. महादेवी भोसले उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज