श्री गणपती फार्मसीमध्ये पालक सभा संपन्न

प्रतिनिधी :- अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील डी.फार्मसी विद्यार्थ्यांच्या शिक्षक-पालक यांची सभा घेण्यात आली. शिक्षक व पालक यांच्यामध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा पालकांसमोर मांडणे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रा. शिवराज ढगे यांनी महाविद्यालयाची तसेच महाविद्यालयात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाबद्दल व विद्यार्थ्यांचा निकाल याबद्दल माहिती पालकांना दिली.यावेळी संस्थेचे सचिव डॉ. आर.डी.बेंदगुडे यांनी पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन केले. पालक प्रतिनिधी सौ. शितल सरवदे व श्री. सचिन तकिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाविद्यालयाने खूप कमी वेळामध्ये मोठी प्रगती केली आहे. या ग्रामीण विभागात असणारी उच्च शिक्षणाची गरज ही या महाविद्यालयाने पूर्ण केली आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रुपाली बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा लेखा जोखा मांडला आणि विध्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आव्हान दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्रा . कोमल यादव,प्रा. आशिष जाधव प्रा. रूपाली राऊत प्रा. पूजा शिंदे व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. मोनिका माळी यांनी काम केले. प्रा. रेणुका शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. धनश्री कारंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज