गणपती फार्मसी मध्ये जीपॅट स्पर्धापरिक्षेवर व्याख्याण

प्रतिनिधी:-श्री गणपती फार्मास्यूटिकल सायन्सेस आणि रिसर्च टेंभुर्णीमध्ये ‘जीपॅट प्रेपरेशन मधील फार्मास्यूटिकल अनालिसिस या विषयावर व्याख्यानचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयांच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यानी दिली. यावेळी अप्पासाहेब बिरणाळे कॉलेज ऑफ फार्मसी सांगलीचे प्राध्यापक डॉ. मनिष कोंडावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. कोंडावर हे एक प्रसिद्ध फार्मसी विद्यापीठ आणि जीपॅट क्षेत्रातील अध्यापक आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी जीपॅट प्रिपरेशनच्या महत्त्वाच्या ‘टिप्स आणि ट्रिक्स’ शेअर केल्या आहेत. फार्मसी नंतर करिअर च्या संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले.

या वाख्यानासाठी तृतीय वर्ष व अंतीम वर्षांतील विद्यार्थी उपस्थित होते. या व्यख्याणात विद्यार्थांनी सक्रियपणे भाग घेतला आणि डॉ. कोंडावर यांच्या मार्गदर्शनात्मक उपायोंने जीपॅट परीक्षेच्या प्रिपरेशनला सुद्धा वर्षातल्या प्रश्नपत्रिकेच्या प्रमुख घटकांसाठी अद्यतन विचार केले. विद्यार्थांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

या आयोजनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या विचारांची साद केली गेली, आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीपॅट प्रिपरेशनसाठी सुद्धा मदतीच्या मार्गदर्शनाची अवसरे मिळाली आहेत.

यावेळी संस्थेच सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे यांनी बोलताना विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा मधून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याचे प्रोत्सान दिले व परीक्षेच्या तयारीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे , बाबा येडगे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. सुकुमार लांडे, प्रा. महादेवी भोसले, प्रा. शिवराज ढगे, प्रा. अक्षय भेंकी व प्रा. कोमल साळुंखे उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा रेणुका शिंदे यांनी काम केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज