श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर -२०२३-२४ वर्षाकारिता ११ व्या परिषदेमध्ये उत्कृष्ट आर्थिक पुनर्रचना व व्यवस्थापनाचा पुरस्कार

प्रतिनिधी :-श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर* कारखान्यास *”भारतीय शुगर”* या देश पातळीवर नामांकित संस्थेतर्फे सन २०२३-२४ वर्षाकारिता ११ व्या परिषदेमध्ये *”उत्कृष्ट आर्थिक पुनर्रचना व व्यवस्थापनाचा पुरस्कार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी हॉटेल सयाजी कोल्हापूर या ठिकाणी *भारतीय शुगर* ने आयोजित केलेल्या 11 व्या वार्षिक परिषदेमध्ये *नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट* कानपुर उत्तर प्रदेशचे संचालक माननीय *श्री. नरेंद्र मोहन व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भारतीय शुगर चे चेअरमन श्री. विक्रमसिंह पी. शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह पी. शिंदे, श्री दत्त शिरोळ कारखान्याचे चेअरमन श्री. गणपतरावं पाटील, श्री. पी. आर. पाटील, चेअरमन राजाराम बापू सहकारी साखर कारखाना लि. वाळवा, श्री. मनोहर जोशी, कार्यकारी संचालक जवाहर सहकारी साखर कारखाना लि. हुपरी उपस्थित होते. श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर चे जेष्ठ संचालक श्री. बाबाराजे देशमुख, संचालक चंद्रकांत शिंदे, संचालक नंदन दाते, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर श्री. स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक श्री अभिजित डुबल, शेतकी अधिकारी ए पी गायकवाड, डिस्टीलरी मॅनेजर संजय मोरे, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार यांनी सदर पारितोषिक स्वीकारले.

सदर पुरस्कार प्राप्त झालेबद्दल भारतीय शुगर तर्फे श्री. शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन, मा. संचालक मंडळ सभासद, ऊस उत्पादक अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज