श्री शंकर सहकारी साखर कारखाना पाचव्या मस्टर ची बिले 27-12-2023 रोजी बँक खात्यावरती जमा 

प्रतिनिधी :-माळशिरस तालुक्यातील श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सन 2023-24 गळीत हंगामासाठी गाळपास आलेल्या ऊसासाठी रक्कम रू 2600 प्रति मे टन प्रमाणे तसेच बिगर ऍडव्हान्स तोडणी वाहतुकीची पाचव्या मस्टर ची बिले दिनांक 27/12/2023 रोजी सभासद,ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या बँक खात्यावर जमा झाले असलेची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाचव्या मस्टर ची ऊस बिले,तोडणी वाहतुकीची बिले अदा करणेची वचनपूर्ती कारखान्याच्या व्यवस्थानाकडून केली जात असलेचे यावेळी बोलताना श्री कुलकर्णी यांनी सांगितले.

 

          कारखाना व्यवस्थापनाने 4 लाख मे टन गाळपाचे उद्धिष्ट निर्धारित केले असून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठविणेचे आवाहन श्री कुलकर्णी यांनी यावेळी केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज