स्वरूप देशमुख यांना साखर आणि संबंधित उद्योगांसाठी आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म चिनीमंडी द्वारे उत्कृष्ट व्यवस्थापनाचा कार्यकारी संचालकांचा पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी :-श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख यांना साखर आणि संबंधित उद्योगांसाठी आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म चिनीमंडी द्वारे ” उत्कृष्ट व्यवस्थापनाचा ” कार्यकारी संचालकांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अवॉर्ड्स (SEIA) – 2024 चा एक भाग आहे. SEIA पुरस्कार साखर उद्योगातील नाविन्य, सातत्य आणि तंत्रज्ञान स्विकृतीसाठी ओळखला जातो आणि साखर ऊद्योगातील दिग्गज आणि उद्योगातील शिर्ष नेत्यांच्या जागतिक कामगिरी आणि उत्कृष्टतेचा सन्मान करतो.

या पुरस्काराचे वितरण 1 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे “शाश्वतता – जागतिक साखर उद्योगातील आव्हाने आणि संधी या विषयावरील “तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनात होणार आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शंकर सहकारी चे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख* सन्मान करण्यात आला.

यावेळी सोमनाथ भोसले, विलास फडतरे, विठ्ठल तात्या अर्जुन, तुकाराम चव्हाण, ताराचंद दोशी, बिनू पाटील, अंकुश डुबल, भुजबळ सर, शौकत मुलाणी, मंगेश कुलकर्णी, पत्रकार विष्णू भोंगळे, पत्रकार समाधान मिसाळ आदी मान्यवरउपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज