श्री उत्तरेश्वर विद्यार्थी वसतिगृह केम येथे संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती साजरी करण्यात आली

प्रतिनिधी :- श्री उत्तरेश्वर विद्यार्थी वसतिगृह केम येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुयश क्लासेस चे संचालक श्री वसंत तळेकर सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जाणताराजा स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष श्री समीर दादा तळेकर हे उपस्थित होते . यावेळी कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य तथा वासतिगृहाचे चेअरमन श्री सुभाष कदम सर,श्री तुकाराम पवार सर, वसतिगृहाच्या स्वयंपाकीन मावशी श्रीमती उमाबाई पवार तसेच वसतिगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी प्रा. संतोष साळुंखे सर यांनी संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या कार्याची माहिती सांगितली व अधीक्षक श्री सागर महानवर सर यांनी आभार मानले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज