श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये स्वामी विवेकानंद सप्ताह निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न तसेच पालकांनी लुटला संगीत खुर्चीचा आनंद

प्रतिनिधी :-श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये विवेकानंद सप्ताह निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आणि रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. पल्लवी सचिन रणशृंगारे व माता पालक अध्यक्ष कल्पना प्रशांत तळेकर यांनी रांगोळी स्पर्धेचे उद्घघाटन केले‌ इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी विविध सुंदर आणि सुरेख रांगोळ्या काढून उपस्थितांचे मने जिंकली.हळदी कुंकू कार्यक्रमाला सौ.अश्विनी टकले,सौ.प्रितम तळेकर,सौ.अश्विनी बिचितकर,सौ सोनाली धर्मराज,सौ.पुजा धर्मराज,सौ.सोनाली तळेकर,सौ.उज्वला तळेकर,सौ.सुनिता तळेकर,सौ रूपाली सुरवसे,सौ.राणी तळेकर,सौ.कल्पना तळेकर,सौ.मिनल तळेकर,सौ.पदमिनी तळेकर,सौ.सविता गावडे,सौ.सरस्वती गुळवे,सौ.सोनिया वेदपाठक,सौ.विजया वेदपाठक,सौ.अन्नपूर्णो राऊत,सौ.सलमा झारेकरी, शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य आणि माता पालक संघ मधील महिला सदस्य आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. पालकांनी संगीत खुर्ची तसेच डोळ्याला पट्टी बांधून मडके फोडणे या फनी गेम्सचा विद्यार्थ्यांसोबत आनंद घेतला दिनांक 12/01/2024 ते 19/01/2024 स्वामी विवेकानंद सप्ताह मध्ये विद्यार्थ्यांच्या कबड्डी,खो,खो स्पर्धा,फनी गेम्स, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, उत्साहात संपन्न झाल्या या सर्व स्पर्धेचे सुत्रसंचलन श्री के.एन वाघमारे सर यांनी केले स्वामी विवेकानंद सप्ताह सांगता मा.प्रा डॉ मच्छिंद्र नागरे सर यांच्या ओजस्वी शैलीतून झाली शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगितले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर आणि पर्यवेक्षक श्री बी.व्ही सांगवे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक श्री डी.एन तळेकर सर,श्री पी.डी कोंडलकर सर,श्री जी.एस कुंभार सर,श्री पवार सर ,श्री पोदार सर,श्री पी.डी पाटील सर,श्री घुगे एस.एस,श्री घुगे एस.एम सर ,श्री जी.के जाधव सर प्रशालेतील सर्व गुरूदेव कार्यकर्ते तसेच महिला शिक्षिका मध्ये सौ नरखेडकर मॅडम, सौ कुंभार मॅडम, सौ पी.के राऊत मॅडम ,सौ गाडे मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे स्वामी विवेकानंद सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज