अध्यक्ष सागरराज तळेकर यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त एस .एस .सी टॅलेंट सर्च परीक्षा श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये संपन्न

प्रतिनिधी :सागरराज तळेकर यांच्या संकल्पनेतून
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त एस.एस .सी टॅलेंट सर्च परीक्षा श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये संपन्न झाली. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन आणि पुष्पहार अर्पण रत्नाकर तळेकर सर आणि श्री गोरख खानट यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी यांच्या पुतळ्याचे पूजन प्रशालाचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर यांनी केले. पुष्पहार अर्पण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर यांनी केले.एस.एस.सी टॅलेंट सर्च परीक्षा उद्घघाटनाला उपस्थित असणारे मान्यवर शिवाजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर उपाध्यक्ष गणेश तळेकर, श्री गोरख खानट,श्री रत्नाकर तळेकर सर,ए.पी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील, शिवसेना नेते श्रीहरी तळेकर ,श्री समाधान गुरव यांचा स्वागत सत्कार मा.मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर यांनी केला‌.एस.एस.सी टॅलेंट सर्च चे आयोजक श्री सागरराज तळेकर यांचा विशेष सत्कार मा. मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी केला.या एस.एस.सी टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये केम परिसरातील श्री उत्तरेश्वर हायस्कूल, राजेभाऊ तळेकर विद्यालय, नूतन विद्यालय, शारदाताई पवार विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज