श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये डॉ.बापूजी साळुंखे वनराई ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन

केम– श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी डॉ. बापूजी साळुंखे वनराई ऑक्सिजन पार्क या पर्यावरण पूरक उपक्रमाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

या कार्यक्रमात विविध प्रकारची 101 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाची सुवर्णसंधी साधत, निसर्गाचा पर्यावरणपूरक समतोल साधण्यासाठी या शालेय परिसरात भरपूर ऑक्सिजन मिळण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली.

या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष सौ. पल्लवी सचिन रणशिंगारे, उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर, श्री सागर कुरडे, श्री विजयकुमार तळेकर , श्री हरिभाऊ तळेकर, श्री राहुल रामदासी, श्री लक्ष्मण गुरव, श्री धनंजय ताकमोगे, श्री दत्तात्रय खुपसे, सौ.अमृता सुनील दोंड, श्री गणेशआबा तळेकर, श्री सचिन रणशिंगारे, पैलवान श्री शिवाजी पाटील, प्राचार्य श्री सुभाष कदम, प्रा.अमोल तळेकर, वस्तीगृह अधीक्षक श्री सागर महानवर, ज्युनिअर कॉलेजचे सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ऑक्सिजन पार्कसाठी दादाश्री फाउंडेशन वीटचे संस्थापक श्री काका काकडे यांनी सर्व रोपे मोफत उपलब्ध करून देऊन अनमोल सहकार्य केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज