श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी राष्ट्र निर्मितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग याविषयी मार्गदर्शन संपन्न 

प्रतिनिधी (केम)- श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज,केम याठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा राष्ट्र निर्मितीत सक्रिय सहभाग या महत्त्वपूर्ण विषयावर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील प्रा.लक्ष्मण राख यांचे अतिशय महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आपल्या मनोगतात प्रा.लक्ष्मण राख

यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांचे सामाजिक योगदान तसेच त्यांची समाजाप्रती असणारी कर्तव्ये यावर परखड असे भाष्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये समजावून सांगताना आपले चारित्र्य जपण्याचा व निर्व्यसनी राहण्याचा मोलाचा संदेश दिला. सोलापूर जिल्ह्यात उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज हे एक नवनवीन उपक्रम राबविणारे संस्कृती केंद्र म्हणून ओळखले जाते, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले व येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्राचार्य श्री सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, आभार प्रा.संतोष साळुंखेयांनी मानले. यावेळी प्रा.संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे, प्रा.पराग कुलकर्णी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हे उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज