श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध छोटा‌ पुढारी घनश्याम दरोडे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  

प्रतिनिधी :-शुक्रवार दि 15 डिसेंबर 2023 रोजी श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध छोटा‌ पुढारी घनश्याम दरोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सुरूवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे, श्री सागर कुर्डे ग्रामपंचायत सदस्य ‌केम, युवासेना अध्यक्ष श्री सागरराजे तळेकर, भाजप अध्यक्ष श्री गणेश आबा तळेकर यांनी छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांचा स्वागत सत्कार केला. विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात समाजामध्ये चांगला बदल घडवा आई-वडिलांचे स्वप्न साकार करा असे अनमोल प्रतिपादन महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी केले आणि उपस्थितांची मने जिंकली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, सचिन रणशृंगारे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य धनंजय ताकमोगे सागरराजे तळेकर युवासेना अध्यक्ष, सागर कुर्डे ग्रामपंचायत सदस्य केम, विजयसिह ओहळ ग्रामपंचायत सदस्य केम, दळवी सर, विष्णुपंत अवघडे ग्रामपंचायत सदस्य केम, दिपक भिताडे ,बापू तळेकर तसेच केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या मार्गदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के एन वाघमारे सर यांनी केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज