श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम याठिकाणी भित्तीपत्रिका उदघाटन करून मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी :-श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी मराठी साहित्यातील अजरामर कवी व सुप्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते श्री नवनाथ लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री दशरथआप्पा तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर, प्राचार्य श्री सुभाष कदम हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर या ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मराठी राजभाषा दिन या भित्तीपत्रिकाचे उद्घाटन श्री नवनाथ लोंढे व सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री नवनाथ लोंढे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून या कॉलेजच्या नवोपक्रमाचे कौतुक केले. श्री दशरथआप्पा तळेकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. शालेय समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर यांनी मराठी भाषा दिन आणि मराठीचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सुभाष कदम यांनी मराठी भाषाचे वेगळेपण सांगितले.

या कार्यक्रमास प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा . एस.के.पाटील, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे आणि इयत्ता अकरावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज